दवाखाना हा लोक बिरादरी प्रकल्पाचा मूख्य आधारस्तंभ आहे. या दवाखान्याचे क्षेत्र आता व्यापक झाले आहे. माडिया आदिवासींची दु:ख सहन करण्याची क्षमता प्रचंड आहे पण बर्याचदा जेव्हा ते दवाखान्यात येतात तेव्हा त्यांची स्थिती खूपच बिकट झालेली असते. कारण आजार झाल्यावरही बरेच दिवस , बरेच आठवडे त्यांना दवाखान्यात आणले जात नाही. पाठ्य-पुस्तक उपचार पद्धती अशावेळेस बर्याचदा अपुरी पडते कारण रुग्णांची स्थिती खूपच नाजूक असते.
ऐंशी च्या सुरुवातीला डॉ.प्रकाश ना scurvy चे बरेच रुग्ण असल्याचे आढळून आले. विटामिन सी च्या कमतरतेमुळे होणारा हा रोग आहे, ज्यामुळे दाताच्या हिरड्या कमजोर होतात.
गडचिरोली हा महाराष्ट्रातील प्रशासकीय जिल्हा आहे. हेमलकसा हा गाव तालुका. भामरागड,जि. गडचिरोली ला वासतवयात आहे. भामरागडला त्रिवेणी संगम आहे. फार कमी ठिकाणी असे संगम आहेत. इंद्रावती, पामुलगौतमी आणि गोदावरी या नद्या इथे एकत्र येतात. हेमलकसा हे खासगी संघटन असून सन १९७३ ला श्री. मुरलीधर देवीदास आमटे (बाबा आमटे) यांनी माडिया गोंड आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी याची प्रस्थापना केली. हेमलकसा चारही बाजूने घनदाट जंगलाने व्यापलेला आहे . हेमलकसा हे गाव नागपूर वरून ३८० कि. मी. लांब आहे. हेमलकसा या गावात मुख्यता माडिया गोंड आदिवासी राहतात.
