डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांना २००८ सालच्या रॅमन मॅगसेसे
पुरस्कार सामाजिक नेतृत्व (community leadership) साठी सन्मानित करण्यात आले आहे.
माडिया गोंड आदिवासींना वैद्यकीय सेवा/सुविधा पुरवून, त्यांना शिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांची दखल म्हणून हे पारितोषिक दिले असल्याचे मॅगसेसेच्या विश्वस्तांनी म्हंटले होते.
" डॉ.प्रकाश आमटे हे आनंदवनातच मोठे झाले, आनंदवन हे महाराष्ट्रातील कुष्ठरोग पुनर्वसन केंद्र असून त्याची स्थापना त्यांच्या वडिलांनी , प्रसिद्ध गांधीवादी बाबा आमटे यांनी केली. डॉ.प्रकाश यांचा नागपुरात शल्य चिकित्सेचा पदव्युत्तर अभ्यास सुरु असताना बाबा आमटे यांनी सन १९७४ ला त्यांच्यावर माडिया गोंड साठी काम करायची जबाबदारी सोपवली. ते आणि त्यांची डॉक्टर पत्नी या दोघांनी शहरी जीवनाचा त्याग केला व हेमलकसा या जंगलाने व्यापलेल्या दुर्गम प्रदेशात राहायला आले," असे पत्रात नमूद आहे.
|