| | पुणे प्रदर्शन-डिसेंबर-२००७.
लोक बिरादरी प्रकल्पाची छायाचित्रे आणि बांबू शिल्प यांचे प्रदर्शन पुणे येथील बालगंधर्व कला दालन येथे २२ ते २५ डिसेंबर दरम्यान भरविण्यात आले.
पुण्यातील जनतेला या प्रकल्पाच्या कार्याबाबत माहिती व्हायला हवी हा हेतू या मागे होता.
लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रशासक अनिकेत आमटे आणि प्रदर्शनाचे आयोजक हे प्रदर्शनापूर्वी पुण्यात भेटले. त्यांनी स्वयंसेवकांच्या बैठका घेतल्या, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सत्रे आयोजित केली, पत्रकारांसोबत बैठका घेतल्या. अनिकेत आमटे यांच्या सोबत ८ स्वयंसेवक प्रदर्शना साठी पुण्यात आले होते.
माडिया गोंड आदिवासी यांचे जीवन, लोक बिरादरी दवाखाना, लोक बिरादरी आश्रम शाळा, आमटे यांचे प्राणी संग्रहालय अश्या बर्याच विषयावरील एकूण १३८ छायाचित्रे प्रदर्शनात दाखवली गेली. जवळपास २० बाम्बूच्या वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या . त्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. प्रसिद्ध अभिनेते डॉ. श्रीराम लागूंनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
जवळपास ३५००-४००० लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. त्यात विविध वयोगटातील, विविध शिक्षण क्षेत्रातील, विविध व्यवसायातील आणि विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरातील लोक होते.
बांबूची शिल्पे, "नेगल" आणि "समिधा" ही पुस्तके, लोक बिरादरी प्रकल्प सीडी हे लोकांना आवडले आणि त्यांनी ते खरेदी ही केले.

या प्रदर्शनाचा एक फायदा असा झाला की,विविध वयोगटातील, विविध क्षेत्रातील
सुमारे ३०० मंडळीनी एकत्र येऊन "लोक बिरादरी मित्र मंडळा" ची स्थापना केली.
मंडळाची दर महिन्याला एक बैठक घेण्यात येते.
आतापर्यंत अशा ६ बैठका झाल्या आहेत. मंडळाच्या सदस्यांनी योगदान द्यायला सुरुवात केली आहे आणि लोक बिरादरी प्रकल्प आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी गोळा करायला सुरुवात ही केली आहे.
|