महारोगी सेवा समिति ला आदिवासी विकास परियोजनेसाठी १० करोड़ रुपये ची मदत जमा करण्याची परवानगी मिळाली आहे . मदत करनारया भारतीय दाताला आयकर मधे १००% सवलत देइल. हे शेवटचे वर्ष आहे. अधिक माहिती साठी पीडीऍफ़ फाइल पहा - click to download

लोक बिरादरी प्रकल्प

डिसेंबर १९७३ मध्ये आदरणीय श्री मुरलीधर देवीदास आमटे (बाबा आमटे) यांनी आदिवासी लोकांसाठी लोक बिरादरी प्रकल्प सुरु केला होता. या प्रकल्पाच्या फक्त उल्लेखानेच बाबांचे डोळे चमकत. त्या चमकणार्‍या नेत्रांमधून आदिवासींच्या विकासासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार्‍या आपल्या पुत्राबद्दल आणि स्नुषाबद्दल वाटणारा सार्थ अभिमान ओसडून वाहत असे.

अधिक माहिती साठी क्लिक करा

लोक बिरादरी प्रकल्प लोकांची बंधुत्व परियोजना -बाबा आमटे

“ ही परियोजना राबविणार्‍या लोकांसारख्या खूप कमी लोकांशी माझा संबंध आला आहे. एकदम साधे,सच्चे,सदैव हसतमुख प्रकाश आमटे आणि त्यांचे सहयोगी हे भारतातल्या काही मान्यवरांपैकी आहेत ज्यांच्या कामांच्या कथा भारतातल्या शाळेंमध्ये शिकवणीचा भाग आहेत. या परियोजनेबद्दल अधिक माहिती सांगण्याआधी मी हे नमूद केले पाहिजे की प्रकाश आणि मंदाकिनी आमटे हे भारतातल्या काही निवडक लोकांपैकी आहेत ज्यांचा गौरव एका परदेशाने त्यांचे टपाल तिकीट छापून केला आहे. ”

अधिक माहिती साठी क्लिक करा

कार्यसिद्धी

लोक बिरादरी प्रकल्पामधील प्राण्यांचे अनाथालय हे इथे येणार्‍या पाहुण्यांचे एक प्रमुख आकर्षण आहे. या अनाथालयाला कुठलेही अनुदान नाही. अतिशय कष्टाने, मायेने वाढवलेले प्राणी पिंजर्‍यातही किती आनंदी,निरोगी राहतात हे पहाण्यासारखे आहे . परंतू आमच्या दृष्टीने सर्वात अभिमानाची बाब म्हणजे इथे जडणघडण झालेले,इथल्या शाळेत शिकून डॉक्टर झालेले आमचे आदिवासी समाजाचे ३ विद्यार्थी.

अधिक माहिती साठी क्लिक करा

उपक्रम

दवाखाना हा लोक बिरादरी प्रकल्पाचा मूख्य आधारस्तंभ आहे. या दवाखान्याचे क्षेत्र आता व्यापक झाले आहे. माडिया आदिवासींची दु:ख सहन करण्याची क्षमता प्रचंड आहे पण बर्‍याचदा जेव्हा ते दवाखान्यात येतात तेव्हा त्यांची स्थिती खूपच बिकट झालेली असते. कारण आजार झाल्यावरही बरेच दिवस , बरेच आठवडे त्यांना दवाखान्यात आणले जात नाही. पाठ्य-पुस्तक उपचार पद्धती अशावेळेस बर्‍याचदा अपुरी पडते कारण रुग्णांची स्थिती खूपच नाजूक असते.
          ऐंशी च्या सुरुवातीला डॉ.प्रकाश ना scurvy चे बरेच रुग्ण असल्याचे आढळून आले. विटामिन सी च्या कमतरतेमुळे होणारा हा रोग आहे, ज्यामुळे दाताच्या हिरड्या कमजोर होतात.

अधिक माहिती साठी क्लिक करा



हेमलकसा

गडचिरोली हा महाराष्ट्रातील प्रशासकीय जिल्हा आहे. हेमलकसा हा गाव तालुका. भामरागड,जि. गडचिरोली ला वासतवयात आहे. भामरागडला त्रिवेणी संगम आहे. फार कमी ठिकाणी असे संगम आहेत. इंद्रावती, पामुलगौतमी आणि गोदावरी या नद्या इथे एकत्र येतात. हेमलकसा हे खासगी संघटन असून सन १९७३ ला श्री. मुरलीधर देवीदास आमटे (बाबा आमटे) यांनी माडिया गोंड आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी याची प्रस्थापना केली. हेमलकसा चारही बाजूने घनदाट जंगलाने व्यापलेला आहे . हेमलकसा हे गाव नागपूर वरून ३८० कि. मी. लांब आहे. हेमलकसा या गावात मुख्यता माडिया गोंड आदिवासी राहतात.

अधिक माहिती साठी क्लिक करा

 
 
 
वेब साइट कॉग आईटी सोलूशंस प्रा. ली. तर्फे भेट.