इरकडूम्मे

इरकडूम्मे गाव लोक बिरादरी प्रकल्पापासून साधारण १५ किलोमीटरवर आहे. गावकऱ्यांच्या विनंतीनंतर आम्ही येथे एक तलाव खोदायचे ठरविले. पण प्रकल्पाच्या इतर तलाव योजनांप्रमाणेच, आम्ही ग्रामसभेकडून एका कराराची मागणी केली, ज्यात खालील कलमे होती.

१. दारूबंदी
२. तंबाखू, गुटखा, खर्रा बंदी
३. वृक्षतोडबंदी
४. शिक्षणाचा हक्क
५. शिकारबंदी आणि वन्य प्राण्यांचे संगोपन
६. तंटामुक्त गाव

कराराची प्रत मिळाल्यावर, जानेवारी २०१९मध्ये काम सुरु झाले. अंदाजपत्रक साधारण १०.५ लाख रुपयांचे होते. १ लाख रुपये गावातून गोळा करण्यात आले. यामुळे, गावकऱ्यांत एक मालकीची भावना निर्माण झाली. काम पूर्ण होण्यास साधारण १५-२० दिवस लागले.

तलावाचे आकारमान १०० x ५० मीटर आहे आणि तो ३ मीटर खोल आहे. तलावाची साठवण क्षमता साधारण १५,००० घनमीटर आहे.

ग्रामविकास योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

आधी
नंतर