नेलगुंडा - निसर्गाच्या कुशीतील एक गाव

नेलगुंडा हे दंडकारण्यातील गर्द हिरव्या जंगलातील एकाकी गांव. अद्भुत नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने वेढलेले पण पावसाळ्यातील सहा महिने पूर्णपणे एकाकी असलेले. हिवतापाचे संसर्गजन्य ठिकाण आणि शून्य शैक्षणिक संधी असलेला भाग. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडपासून २७ कि. मी.च्या कच्च्या रस्त्याने जोडलेले हे छोटेसे खेडेगाव. भामरागड तालुका नागपूरपासून ३५० कि.मी. अंतरावर आणि चंद्रपूर तसेच गडचिरोलीपासून २०० कि.मी. अंतरावर आहे.

काळाची गरज

जानेवारी २०१५ - लोकबिरादरी प्रकल्पातील नेहमीसारखाच एक दिवस. अचानक आम्ही पाहिले की अंदाजे २०० आदिवासी पुरुष आणि स्त्रिया दुपारच्या वेळी लोकबिरादरीत येऊन दाखल झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील चिंतित भाव आम्हाला पटकन जाणवले. १८ गांवामधून आलेले ते आदिवासी बांधव ४ गोष्टींची मागणी करीत होते:

  • गावकर्यांना साधे मीठ खरिदण्यासाठी २७ कि.मी. पायी अथवा सायकलने यावे लागत होते यासाठी पोलिसांनी जबरदस्तीने बंद केलेला आठवड्याचा बाजार पुन्हा सुरु करण्याबाबत प्रस्ताव
  • ३० कि.मी. परिघात एकही शाळा नसल्याने नवीन शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव
  • कोणत्याही आजारावर प्रथमोपचार मिळतील असे प्राथमिक आरोग्य केन्द्र चालू करण्याबाबतचा प्रस्ताव
  • पावसाळ्यामध्ये एकमेकांपासून विलग होणारी २० गावे एकमेकांना जोडण्यासाठी पूल बांधण्याचे काम करण्याकरिता सरकारवर दबाव आणण्याबाबतचा प्रस्ताव

लोकबिरादरी प्रकल्प ( महारोगी सेवा समिती , वरोरा ) आठवड्याचा बाजार पुन्हा सुरु करण्यात यशस्वी झाला मात्र पुलाच्या बांधकामासंदर्भात नक्षलवादी जमावाच्या विरोधामुळे त्या पुढील कार्यवाही होऊ शकली नाही.

आमचा दृष्टीकोन

नेलगुंडाचे रहिवासी

नेलगुंडाचे रहिवासी माडिया जमातीचे आहेत. माडिया ही द्रविडियन कुळाची गोंद जमात, जी अबुजमड टेकड्यांपासून गडचिरोलीच्या पठारी भागापर्यत आढळते . हे मूळचे शिकारी ,टोळीने रहाणारे , पण आता भातशेती करतात. भारतीय वंशाचे माडिया, त्यांची बोलीभाषा, सांस्कृतिक विविधता जपणारे आहेत.

आमची विचारसरणी

"समाजजीवनाच्या शारीरिक व मानसिक संगोपनासाठी शिक्षण आणि उत्तम आरोग्य अतिशय गरजेचे आहे", ही विचारसरणी हे लोकबिरादरीच्या यशाचे मुख्य कारण आहे. ह्याच विचारांनी प्रेरित होऊन आम्ही नेलगुंडा येथे शाळा आणि आरोग्यकेन्द्र सुरु करणार आहोत, ज्यामुळे या आदिवासी भागात दूरवर रहाणारा खेडूतही त्याचे आणि त्याच्या पुढील पिढीचे आरोग्य उत्तम राखू शकेल.

अमंलबजावणी योजना

पायाभूत सुविधेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेसाठी येथे दोन खोल्या तयार आहेत परंतु आजच्या घडीला इमारतीचे स्वरुप अतिशय वाईट आणि वापरण्यास अयोग्य आहे. ग्रामीण लोकांचा सक्रिय पाठिंबा आणि सहभाग यामुळे आम्ही थोडा भूखंड ताब्यात घेऊन त्या जमिनीवर काही सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात यशस्वी झालो आहोत. त्यासाठी योग्य कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे. येथे स्वयंपाकघर आणि धान्य साठविण्यासाठी कोठीचीही गरज आहे कारण येथे शिक्षण घेणाय्रा मुलांना सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण शाळा देणार आहे. मुला-मुलींसाठी वेगवेगळी व वापरण्यास योग्य अशा न्हाणीघरांचीसुध्दा गरज आहे. विद्यार्थी व कर्मचार्यांसाठी शाळा पिण्यायोग्य पाण्याचीही सोय करणार आहे .
योजनेला त्वरीत सामोरे जावे लागणारी काही आव्हाने अशी आहेत:

  • रस्ते नाहीत, ओंढ्यांवर पूल नाहीत, पावसाळ्यात पोहचण्याच्या पलिकडे
  • सर्व विद्यार्थी त्यांच्या पिढितील शाळेत जाणारे पहिले
  • दूरस्थ ठिकाण

अंमलबजावणी तपशील

योजना अंमलबजावणी वेळेनुसार
क्रमांक क्रिया ( कामे) काम पूर्ण करण्याची तारीख
भाडेपट्ट्याने जमीन ताब्यात घेणे लवकरात लवकर
शाळेच्या इमारतीचे बांधकाम व सुसज्जीकरण ०१/०९/२०१५
कर्मचारी भरती प्रक्रिया ०१/०६/२०१५
शाळा कामकाज आरंभ १५/०९/२०१५


पदाधिकारी आणि कामकाज पत्रक
क्रमांक हुद्दा उद्देश / जबाबदारी वेळ
संचालक संपूर्ण पर्यवेक्षण , कामकाजाबाबत निर्णय व देखरेख संर्पूण वेळ
पर्यवेक्षक योजनेतील रोजचे कामकाज देखरेख संर्पूण वेळ
कुशल शिक्षक (३) इग्रजी,गणित,सामान्यविज्ञान निपुण आळीपाळीने येणे
स्थानिक शिक्षक(२) स्थानिक भाषेत प्रभुत्व आणि बालअध्यापन शास्रात निपुण संर्पूण वेळ
मदतनीस/स्वैपाकी मुलांसाठी जेवण व नाश्ता बनविणे संर्पूण वेळ


खर्च

आवर्ती खर्च
क्रमांक विषय महिन्याचा अंदाजे खर्च (रुपये) वार्षिक अंदाजे खर्च (रुपये)
पगार
संचालक
पर्यवेक्षक
कुशल शिक्षक-(३)
स्थानिक शिक्षक-(२)
मदतनीस व स्वैपाकी-(२)
९०,०००
१५,०००
१३,०००
१२,०००
८,०००
५,०००
१०,८०,०००
जेवण ( १० महिन्यांसाठी )
नाश्ता ( अंदाजे ४० विद्यार्थांकरिता )
नाश्ता ४० विद्यार्थांसाठी प्रत्येकी १५ रु दराने.
जेवण ( अंदाजे ४० विद्यार्थांकरिता )
४० विद्यार्थांसाठी प्रत्येकी २५ रु दराने
७२,०००

२७,०००

४५,०००
७,२०,०००
पुस्तके व इतर साहित्य
४० विद्यार्थांकरिता
प्रत्येकी ५०० रु प्रमाणे
३०,०००
4 गणवेष ( २ जोड )
४० विद्यार्थांकरिता
प्रत्येकी २५० रु प्रमाणे
३०,०००
एका वर्षासाठी एकूण खर्च १८,६०,०००
दोन वर्षासाठी एकूण खर्च
( अंदाजे २०% वाढीव दराने पहिल्या वर्षाच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार )
२२,३२,०००
तीन वर्षासाठी एकूण खर्च
( अंदाजे २०% वाढीव दराने दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार )
२६,७८,४००
तीन वर्षासाठी एकूण आवर्ती खर्च ६७,७०,४००


एक वेळ कायम खर्च
क्रमांक खर्चाचे विवरण एक वेळ किंमत ( रुपये )
खोल्या व न्हाणीघरे बांधकाम ५०,००,०००
शिक्षक व विद्यार्थी यांना हेमलकसा येथे येण्याजाण्यासाठी चारचाकी वाहन १५,००,०००
सौरऊर्जा प्रणाली व सौरऊर्जा पाणीतापक १०,००,०००
एकूण एकवेळ कायम खर्च ७५,००,०००

तुमची मदत फार मोलाची ठरेल!

तुम्ही या प्रकल्पासाठी देणग्या पाठवून मदत करू शकता. देणगी पाठवण्यासाठी इथे क्लिक करा.