लोक बिरादरी दवाखाना, हेमलकसा वृत्तपत्रिका
शीर्षक डाऊनलोड
जानेवारी ते मार्च वृत्तपात्रिका-२०२४ Download
वार्षिक वृत्तपात्रिका-२०२२-२०२३ Download
जुलै ते सप्टेंबर वृत्तपात्रिका-२०२३ Download
एप्रिल ते जुन वृत्तपात्रिका-२०२३ Download
जानेवारी ते मार्च वृत्तपात्रिका-२०२३ Download
वार्षिक वृत्तपात्रिका-२०२१-२२ Download
जुलै ते सप्टेंबर वृत्तपात्रिका-२०२२ Download
एप्रिल ते जुन वृत्तपात्रिका-२०२२ Download
जानेवारी ते मार्च वृत्तपात्रिका-२०२२ Download
वार्षिक वृत्तपात्रिका-२०२०-२१ Download
सप्टेंबर ते डिसेंबर वृत्तपत्रिका-२०२१ Download

लोक बिरादरीच्या दवाखान्यामागची दृष्टी

अनेक शतके दुर्लक्षित असलेली माडिया गोंड ही आदिवासी जमात दंडकारण्य जंगलात [मध्य भारत] वास्तव्यास आहे. घनदाट झाडी, अनेक वन्यजीव, खळाळत्या नद्यांनी नटलेला हा प्रदेश. गडचिरोली जिल्हा हा निरक्षरता, दारिद्र्य आणि बेरोजगारी ने ग्रासलेला प्रदेश. ७५% घनदाट झाडीने व्यापलेल्या या भागात मनुष्यवस्तीच्या खुणा अनेक वर्ष सापडल्या नव्हत्या. शोषणकर्त्यांच्या सततच्या कारवायांमुळे अत्यंत हलाखीत इथले आदिवासी जगत. सरकार दरबारी ही एकवाक्यता नसल्यामुळे, बंडखोर वृत्तीला खतपाणी घालण्याने, इथे सतत एक अस्थिरता निर्माण झाली. बंडखोर कारवायांमुळे आणि शोषित समाजजीवनामुळे रोजचे जगणे मुश्कील झाले.

या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन या भागात ना-नफा तत्वावर चालणारा लोक बिरादरी हा प्रकल्प आदिवासींच्या शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक विकासासाठी स्थापन करायचा या उद्देशाने बाबा आणि त्यांचे कार्यकर्ते इथे आले, आणि डॉ प्रकाश यांनी प्रकल्पाचे आणि दवाखान्याचे नेतृत्व सुरु केले.

दवाखान्याची आव्हाने

प्रकल्प सुरु झाला तेव्हा डॉ प्रकाश आणि त्यांच्या सहकाऱ्यांपुढे सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे इथल्या आदिवासी लोकांचा विश्वास संपादन करणे. दवाखाना सुरु होण्यापूर्वी इथले आदिवसी आपल्या रोग निदानासाठी तांत्रिक-बाबांकडे जात असत आणि पारंपारिक वैदू त्यांना देवाच्या नावाने बलिदान करायला लावत. पण प्रकल्पातल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे काही लोकांचे वाचवण्यात डॉ प्रकाश यांना यश आले, आणि तेव्हा पासून आदिवासी लोकांनी डॉ प्रकाश आणि लोक बिरादरीवर पूर्ण विश्वास टाकला.

सुरुवातीच्या काळात प्रकल्पात असलेल्या सुविधा अगदीच मुलभूत होत्या. बरेचदा भूल न देता ऑपरेशन्स करावी लागली. अशा वेळी माडियांच्या वेदना आणि कष्ट सहन करण्याच्या असीम क्षमतेचे प्रात्यक्षिक मिळायचे. डॉ प्रकाश आणि सहकाऱ्यांना बरेचदा आशा शस्त्रक्रीया कराव्या लागल्या ज्यांचा त्यांना आधी अनुभव नव्हता.

पावसाळ्यात जेव्हा ६-६ महिने प्रकल्प बाकीच्या जगापासून तुटलेला असे, तेव्हा साधन सामग्री प्रकल्पापर्यंत पोहोचवणे हे भगीरथ कष्ट प्रकल्पाचे कार्यकर्ते जगन मचकले करत.

दवाखान्यातील सेवा

लोक बिरादरी प्रकल्पा मार्फत हेमलकसा या गावी अतिमागास अशा माडिया व गोंड आदिवासीं करीता मोफत सर्वोपचार दवाखाना चालवीला जात आहे. १९७० च्या काळात दळणवळणाची साधने व रस्ते नसल्याने इथल्या रुग्णाला शहरात पाठवणे अशक्य होते. अशा वेळी डॉ प्रकाश आणि डॉ मंदाकिनी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शेकडो आदिवासींच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. हजारो मोडलेले हात-पाय यांच्यावर प्लास्टर करून उपचार केले. अस्वलाने हल्ला केलेल्या अनेक रुग्णांच्या भयानक जखमांवर २००-२०० टाके घालून यशस्वी इलाज केले. हजारो सर्प दंशाचे रुग्ण त्यांनी बरे केले. किडलेल्या दातांना काढून रुग्णांना दिलासा दिला. अनेक गरोदर स्त्रिया दवाखान्यात प्रसूत झाल्या. हे सगळे या २ डॉक्टरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने केले.

बहु विशेषता रुग्णालय

२००१ मध्ये डॉ प्रकाश आणि डॉ मंदाकिनी यांच्या थोरल्या मुलाने म्हणजेच डॉ दिगंत आमटे आणि त्यांच्या पत्नी (स्त्रीरोगतज्ञ) डॉ अनघा आमटे या नव्या पिढीने लोक बिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्याची संपूर्ण जवाबदारी स्वीकारली, आणि अधिक जोमाने हे लोक सेवेचे कार्य पुढे नेण्याचे प्रयत्न सुरु केले.

२०११ साली असे लक्षात आले की वाळवीने दवाखान्याच्या इमारतीचा फडशा पाडायला सुरुवात केली आहे, आणि मग २०१२ मध्ये दवाखान्याची नवी इमारत बांधण्याचा संकल्प दिगंत-अनघा यांच्या पुढाकारातून उभा राहिला. त्याकरीता लागणारे नकाशे त्यांनी स्वतः बनवून घेतले. २०१३ साली सप्टेंबर मध्ये इमारतीचे काम सुरु झाले, आणि २६ डिसेंबर २०१४ ला म्हणजेच बाबा आमटे यांच्या जन्म शताब्दी वर्षाला या नवीन दवाखान्याचा लोकार्पण सोहळा साजरा झाला.

नवीन दवाखान्यात Operation-Theatre, Delivery-Room, X-Ray, Colour-Doppler, Auto-Analyzer, Neonatal-ICU, Pathology-Lab, Dental-Unit, Eye-CheckUp-Unit, Mobile-Hospital अशासारख्या अत्याधुनिक सुविधा आदिवासींकरीता विनामूल्य उपलब्ध आहेत.

दवाखान्याचा कर्मचारी वर्ग