निवेदन

१७/०३/२०२० पासून हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील आदेश येईपर्यंत बंद

कोरोना व्हायरसचा प्रसार देशात आणि महाराष्ट्रात झपाट्याने होत असल्याने आणि सुरक्षेबाबत शासनाने आदेश दिले असल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून पुढील आदेशापर्यन्त लोक बिरादरी प्रकल्प देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहील. लोक बिरादरी प्रकल्प व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.
गेली ४६ वर्ष हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आदिवासी विकासाचे काम करीत आहे. सर्वोपचार मोफत दवाखाना, ६५० विद्यार्थ्यांसाठी १ ली ते १२ वी पर्यंत ची आश्रमशाळा, वन्यजीव अनाथालय व पर्यावरण संवर्धन, गाव विकास, तलाव निर्मिती व खोलीकरण, नेलगुंड्यासारख्या दुर्गम भागात शाळा अशा विविध स्तरावर अविरत कार्य करीत आहे. शासनाच्या आदेशानुसार आश्रमशाळेला सुद्धा सुट्टी देण्यात येत आहे. प्रकल्पात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि दवाखान्यातील आदिवासी रुग्णांना येणाऱ्या पर्यटकांकडून कोरोना व्हायरसची बाधा होऊन प्रसार होऊ नये म्हणून प्रकल्प बंद ठेवण्यात येत आहे. सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क सचिन 7588772858

गोष्ट लोक बिरादरीची...

प्रकाशझोतात लोक बिरादरी

संपर्क

२ महिने आधी पूर्व कल्पना दिल्यास एका रात्रीच्या राहण्याची सोय प्रकल्पात होईल. खालील व्यक्तींना ई-मेल करून कृपया राहण्याच्या व्यवस्थेची खात्री करून घ्यावी ही विनंती. हा भाग अतिशय दुर्गम प्रदेश असल्या कारणाने येथील सेवा-सुविधा अगदी साधी असेल याची नोंद घ्यावी.

पत्ता

लोक बिरादरी प्रकल्प,
तालुका : हेमलकसा आणि पोस्ट : भामरागड,
जिल्हा : गडचिरोली, पिनकोड : ४४२७१०,
महाराष्ट्र, भारत

संपर्क

सोमवार - शुक्रवार: फक्त सकाळी ०९:०० ते सायं ०५:००
श्री. सचिन मुक्कावार
(ई-मेल) sachinmukkawar83@gmail.com
(मोब.) ७५८८७७२८५८

मुख्य कार्यालय

महारोगी सेवा समिती, वरोरा
तालुका : वरोरा आणि पोस्ट : आनंदवन,
जिल्हा : चंद्रपूर, पिनकोड : ४४२९१४,
महाराष्ट्र, भारत
(वेबसाईट) www.anandwan.in

कसे पोहोचाल?

हा प्रकल्प जेथे वसला आहे ते हेमलकसा महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात आहे .

रस्त्याच्या मार्गाने (नागपूर ते लोक बिरादरी प्रकल्प)

हेमलकसा - एकूण ३३० कि.मी.
नागपूर ते चंद्रपूर (१५० कि.मी.)
चंद्रपूर ते बल्लारपूर (२० कि.मी.)
बल्लारपूर ते आल्लापल्ली (१०० कि.मी.)
आल्लापल्ली ते लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा (६० कि.मी.)

रेल्वे मार्ग (मुंबई/पुणे - नागपूर)

जवळचे रेल्वे स्टेशन: नागपूर (पुण्याहून येणाऱ्यांसाठी), बल्लारशाह (मुंबई/नाशिकहून येणाऱ्यांसाठी)

हवाई मार्ग (मुंबई/पुणे - नागपूर)

डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळ, नागपूर

नकाशा

फेसबुक  युट्यूब