मला (न) कळलेले बाबा

मी व बाबा चोवीस तास सहवासात असे. निदान हजार दिवस तरी असतील. दोन्ही भारत जोडो यात्रा, कसरावदचे दोन महिन्यांचे दोन-तीन मुक्काम, दिल्ली-बेळगाव-कलकत्त्याचा प्रवास, मुंबई इथली बाबांची शस्त्रक्रिया व शेवटी बाबा रक्ताच्या कर्करोगानं आजारी असतानाचे सहा महिने, मी बाबांचा निकट सहवास अनुभवला, तरीही मला बाबा दोन टक्केही समजले नाहीत.

लेखक - विलास मनोहर

भाषा - मराठी

समिधा

थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या गृहिणी, सखी, सचिव बनून आयुष्यभर सावलीसारख्या राहिलेल्या साधना आमटे यांचे हे चरित्र आहे. त्यांच्या दांपत्यजीवनाबरोबरच साधनाताईंच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची ओळखही पुस्तकातुन होते. सीताकांत प्रभू यांनी या चरित्राचे लेखांकन केले असून, पुस्तकाला राम शेवाळकर यांची साक्षेपी प्रस्तावना लाभली आहे.

लेखिका - साधना आमटे

भाषा - मराठी, इंग्रजी

नेगल १, २

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. त्याचीच ही लोकविलक्षण कहाणी. पशू, पक्षी, प्राण्यांच्या अद्भूत आणि अजब विश्वात घेऊन जाणारं हे आगळंवेगळं लेखन. डॉ. प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांनी संगोपन केलेल्या वन्य प्राण्यांच्या कहाणीचे हे दोन भाग आहेत.

लेखक - विलास मनोहर

भाषा - मराठी, हिंदी, फ्रेंच, ओडीशी

प्रकाशवाटा

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं,त्यांची पिळवणूक थांबवावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. बाबांचं हे स्वप्न हेमलकशात प्रत्य़क्षात कसं उतरतंय त्याची ही गोष्ट.

लेखक - डॉ. प्रकाश आमटे

भाषा - मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड

रानमित्र

माणूस आणि प्राणी यांच्यातील अनोख्या नात्याची आगळीवेगळी गोष्ट सांगणारे डॉ. प्रकाश आमटे यांचे हे देखणे पुस्तक आहे. हेमलकशाच्या दुर्गम जंगलात जंगली प्राण्यांच्या सहवासात एक वेगळंच जगणं घडलं. त्या जगण्याची ही गोष्ट आहे.

लेखक - डॉ. प्रकाश आमटे

भाषा - मराठी

एका नक्षलवाद्याचा जन्म

एक साधासुधा आदिवासी झुरू नक्षलवादी कसा होतो याची थक्क करणारी गोष्ट

लेखक - विलास मनोहर

भाषा - मराठी